Additional information
| Author | Namdev Dhasal |
|---|---|
| Binding | Paperback |
| Language | Marathi |
| Publication | Lokvangmaya Griha |
₹90.00
प्रत्येक कलावंताला स्वत:चे एक वर्गचरित्र असते. मीही ह्याला अपवाद असू शकत नाही. ज्याला व्यवस्थेने तीन हजार वर्षे ज्ञानास, उत्पन्नास, संपत्तीस, मानव प्रतिष्ठेस वंचित केले अशा सर्वहारा दलित वर्गाचा मी एक कवी. विसाव्या कातल्या निम्न बदलामुळे मीही कवितेपर्यंत येऊन पोचलो. पोचणारच होतो, जसं गुलामगिरीकडून सरंजामीकडे, सरंजामीकडून भांडवलशाहीकडे, भांडवलशाहीकडून शास्त्रीय समाजवादाकडे आणि पुढे असेच सुखी समृद्ध राजसंस्थाविहीन रस्त्याकडे, जन्म-विकास-बदल या सूत्रातून संभवणाऱ्या सातत्याच्या वाटचालीकडे, सर्वकष मुक्तीकडे, सर्जनाकडे.
…मी माझ्या कवितेला वर्गीय हत्यार मानतो. आणि माझी कविता जेव्हा हत्याराची भूमिका घेते तेव्हा माझ्यासमोर माझे शत्रू आणि मित्र अशी वर्गवारी करण्याची निकड निर्माण होते. ज्या लोकांना मी जनता मानतो आणि ज्या लोकांच्या कष्टातून आजचा भारत उभा आहे ते लोक माझे अढळ श्रद्धास्थान बनतात. मग माझी कविता खेड्यापाड्यांतील वैराण दारिद्र्याचा, अज्ञानाचा, दुःखाचा वेध घेते. तिरस्कार करते, त्यांच्या मुळावर घाव घालते. हे होत असताना माझ्या कवितेला पिळदार कलात्मक घाट येतो. माझी कविता वर्गशत्रूशी हाडवैराचा खेळ करते.
Out of stock
| Author | Namdev Dhasal |
|---|---|
| Binding | Paperback |
| Language | Marathi |
| Publication | Lokvangmaya Griha |
Reviews
There are no reviews yet.