Sale!

जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजीमहाराज / Jagatil Sarvottam Raja Chhatrapati Shivaji Maharaj

360.00

जगातल्या सर्व राजांनीही कौतुकाने निरखावं, जगातल्या सर्व राज्यकर्त्यांनी साक्षेपानं अभ्यासावं नि जगातल्या सर्व विचार साधकांनी सतत स्मरावं असं देदीप्यमान व्यक्तिमत्व म्हणजे श्री छत्रपती शिवराय ! हजारो पानं लिहिली तरी ती अपुरीच पडतील असं हे लोकोत्तर व्यक्तिमत्त्व ! त्याची सकळ गाथा सुरू करावी कुठून आणि संपवावी कोठे असा पेच भल्याभल्यांना पडतो. त्यातून ना इतिहासकार सुटले ना बखरकार. मात्र शिवप्रभूंच्या तेजानं दिपून गेलेल्या नि त्यांच्या चिंतनात आपलं अवघं आयुष्य व्यतीत केलेल्या शिवभक्त श्री. काशिनाथ मढवी या इतिहास अभ्यासकाराने एक सरळ सोपा मार्ग निवडला आणि तो म्हणजे, पुस्तकाच्या माध्यमातून श्री शिवरायांच्या १०० गुणांचा हा महापट वाचकांसमोर मांडण्याचा ! श्री छत्रपती हे जगातील सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ राजे कसे हे विशद करण्यासाठी श्री काशिनाथ मढवी यांनी शिवरायांच्या अद्वितीय इतिहासातून, त्यांच्या १०० लोकविलक्षण वैशिष्ठ्यांची यादीच वाचकांसमोर सादर केलीय आणि शिवप्रभूंच्या लखलखत्या इतिहासाची सोनेरी पानं जगासमोर ठेवलीत. आपला अभ्यास नि व्यासंग पणाला लावून या शिवभक्ताने, सर्व शिवप्रेमींना आणि विलक्षण वाचकांना, या ग्रंथाच्या रुपानं आणखी एक ऐतिहासिक दस्तावेज बहाल केला आहे. अखिल भारतवर्षाच्या लाडक्या अशा शिवबाच्या असामान्य कर्तुत्वाचे पैलू पुन्हा पुन्हा चाळावे, अभ्यासावे, स्मरावे नि लक्षात ठेवावे असा हा वेगळा ग्रंथप्रयत्न ! असा वेगळा ग्रंथ साकार करण्याची दृष्टी देणाऱ्या, लाखांच्या पोशिंदा ठरलेला श्री छत्रपतींचा तेजस्वी रूपाला पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन नि त्यांची हीश्रद्धेय ग्रंथ पुजा बांधणार्‍या श्री काशिनाथ मडवी यांनाही सलाम !

– कवी अरुण म्हात्रे

Out of stock

Additional information

Author

Kashinath Madhavi

Binding

Paperback

ISBN

9789380639246

Language

Marathi

Publication

Sanskruti Prakashan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजीमहाराज / Jagatil Sarvottam Raja Chhatrapati Shivaji Maharaj”

Your email address will not be published. Required fields are marked *