Sale!

गुप्त वरदान / Gupta Varadaan

₹160.00

नवकथेचे स्वरूप जाणून घेण्याच्या हेतूने त्यांनी पाश्चात्य साहित्याचे जे सखोल वाचन-चिंतन केले त्यातून ‘गुप्त वरदान’च्या निर्मितीची प्रेरणा त्यांना मिळाली. पाश्चात्य कथांच्या वाचन व्यासंगातून इंग्रजी कथा तसेच इंग्रजीत अनुवादित झालेल्या अन्य भाषांतील कथा वाचताना त्यांच्या मनावर ज्या कथा कोरल्या गेल्या त्या कथांतील सौंदर्याचा अनुभव मराठी वाचकांनाही बेत यावा या हेतूने त्यांनी या कथांचे मराठीत भाषांतर केले आहे. या भाषांतरित कथांसमवेत लेखिका तारा वनारसे यांनी एलिझाबेथ बॉवेन यांनी नवकथेच्या प्रेरणा व स्वरूप या संबंधी केलेल्या विवेचनाचेही भाषांतर ‘गुप्त वरदान’मध्ये समाविष्ट केले आहे. एकंदरीत भाषांतरित प्रस्तावना व भाषांतरित कथा यांचा हा एकत्रित संग्रह आहे.
विषयांचे नावीन्य, जीवनशैलीतील वेगळेपणा, भोवतालच्या परिसराविषयीची विशेषतः निसर्गाविषयीची सजग जाणीव स्नेहपूर्ण दृष्टीकोन यांचा प्रत्यय देणाऱ्या ‘गुप्त वरदान’मधील कथा एका वेगळ्या वातावरणात वाचकाला घेऊन जातात. परंतु असे असले तरी भावना, कल्पना व विचार यांचे आवाहन वाचकमनात सहकंप निर्माण करणारे व प्रत्ययकारी आहे.

In stock

Categories: ,

Additional information

Author

Tara Vanarase

Binding

Paperback

ISBN

9788171857852

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गुप्त वरदान / Gupta Varadaan”

Your email address will not be published. Required fields are marked *