Sale!

दुर्दम्य / Durdamya

780.00

‘दुर्दम्य’ ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावरची कादंबरी आहे. अर्थातच लोकमान्यांच्या जीवनातील प्रमुख-अप्रमुख पण ऐतिहासिक पुरावा असलेल्या घटना व व्यक्ती यात येणारच. प्रश्न या सामुग्रीच्या कलात्मक रूपात व्यक्त होण्याचा. शैलीचे कलात्मक उपयोजन, प्रसंगांची आणि घटनांची दृकप्रत्ययी, रंगत आणणारी रचना, पात्रांच्या लकबींनी आणि स्वभाववैशिष्ट्यांनी आणलेला जिवंतपणा (हे सर्व गाडगीळ एखाद्या शब्दाने किंवा वाक्यानेही घडवून आणतात), संवादांचे पात्रनिहाय वेगळेपण, युक्तिवादातही विलक्षण वक्रता आणि हजरजबाबीपणा, व्यक्ती-व्यक्तीमधल्या संबंधांचे काहीसे ज्ञात आणि बरेचसे अज्ञात, परंतु ज्ञाताशी संगत आणि विश्वसनीय रूपांकन, मानवी चैतन्याचा सर्वव्यापी सुगंध या बाबी चरित्र निरुपणाला कलेच्या पातळीवर नेतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोकमान्यांच्या व्यक्तित्वातील मूलभूत मनोधर्म आणि बाह्य परिस्थिती (राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक इत्यादी) यांचा अनुबंध दाखवीत व्यक्तित्वविकासाची प्रक्रिया गतिमान करून व्यक्तित्वाबद्दल एक समग्र भान उत्पन्न करण्याचे कार्य कादंबरीकाराला करायचे असते. ते सर्व गाडगीळांनी मर्मज्ञपणे केले आहे.
बाळू, बळवंत, बळवंतराव, लोकमान्य आणि निष्काम कर्मयोगी महात्मा या चढत्या श्रेणीच्या विकासमान व्यक्तिमत्त्वाचा आलेख गाडगीळांनी विश्वसनीय स्वरूपात काढला आहे. या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा अनुभव ही कादंबरी देते. टिळकांच्या बहिर्मुखी स्वभावात पुढे चिंतनाच्या स्पर्शाने अंतर्मुखता येते, आरंभीची गृहस्थधर्माची प्रतिकूल वैशिष्ट्ये पुढे त्यांना जखडून न ठेवता त्यांतील आंतरिक भावार्थाशी तन्मय करतात. लोकप्रेम, मित्रप्रेम आणि कुटुंबप्रेम यांत एकरूपता येते. त्यांच्या मूल प्रवृत्ती, त्यांच्या अर्जित वृत्ती आणि त्यांची जीवनध्येयेयांत एकात्मता निर्माण होते. एक सोवळे नेसणारा सनातनी ब्राह्मण अस्पृश्यता नष्ट करू पाहतो, हिंदू-मुसलमानांचे ऐक्य व्हावे अशी प्रामाणिक धडपड करतो. हा व्यक्तित्वविकास गाडगीळांनी कलावंताच्या मर्मदृष्टीतून पाहिला म्हणून ही कादंबरी मराठीतल्या काही श्रेष्ठ कादंबऱ्यांपैकी एक वाटते.

Out of stock

Additional information

Author

Gangadhar Gadgil

Binding

Paperback

ISBN

9788171854219

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दुर्दम्य / Durdamya”

Your email address will not be published. Required fields are marked *