Additional information
| Author | Uddhav J. Shelke |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171855513 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹290.00
धग / Dhag
उद्धव ज. शेळके / Uddhav J. Shelke
कादंबरीकार म्हणून उद्धव शेळके यांना उदंड कीर्ती मिळवून देणारी ‘धग’ ही कादंबरी आहे. एका सामान्य शिंपिणीची कहाणी परिस्थिती विरुद्ध तिने दिलेल्या लढ्याची ही गाथा.
‘कौतिक’ ही एक सामान्य स्त्री, पण तीची झुंज असामान्य आहे. परिस्थिती पुढे ती वाकते आणि म्हणूनच कादंबरी मनाला अधिक जाऊन भिडते. कारण हा शेवट अपरिहार्य असतो. स्थितीचे अनुलंघ्य कवच फोडण्यासाठी ऊरफोड करणारा माणूस, हाच या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे.
ही कादंबरी पूर्णतः ग्रामीण वातावरणातील आहे. तीच्यातील बोली वऱ्हाडी आहे. प्रादेशिक कादंबरी म्हणून तिचा कुणी गौरवाने उल्लेख करतात, तर प्रादेशिकता हे वास्तववादाचे विकृतीकरण (Extension of Realism) असल्यामुळे ते वाङ्मयमूल्य होऊ शकत नाही, अशी ही बाजू मांडली जाते. प्रादेशिकता हे मूल्य होऊ शकत नाही. वाङ्ममयीन तर नाहीच नाही. पण त्या प्रकारची कृती मात्र श्रेष्ठ वाङ्ममयकृती निःसंशय ठरू शकते. बोलीभाषेतील ही कृती अभ्यासताना बुजरेपणा आणि अनास्था या दोन गोष्टी बाजूला ठेवल्या तर ‘धग’ वाचताना अडचण पडत नाही. शब्द स्वतःचा अर्थ सांगत जातात. वाट सापडत राहते आणि कौतिकचा हा असामान्य लढा मनाला जाऊन भिडतो.
‘धग’ ची शैली साधी आहे.निरलंकृत आहे. निरगांठ, सुरगाठ व शेवटी उकल करण्यासाठी हेतूतः राखून ठेवलेले क्षणरहस्ये, ती जपण्यासाठी योगायोगांचा फापटपसारा असे इथे काही नाही. उत्कटता हा तिचा हृद्य विशेष आहे. कठोर वास्तवदर्शन हा तिचा हेतू आहे. आणि म्हणून चाकोरीतल्या कादंबऱ्यांहून वेगळी पडणारी ‘धग’ रसरशीत उतरले आहे.
-केशव मेश्राम
Out of stock
| Author | Uddhav J. Shelke |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171855513 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.