Additional information
| Author | Grace |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171855247 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹320.00
सांध्यपर्वातील वैष्णवी
‘सांध्यपर्वातील वैष्णवी’ हा कवी ग्रेस यांचा
चौथा कवितासंग्रह. दरम्यान ‘चर्चबेल’ व
‘मितवा’ हे दोन ललितबंध आपल्या हाती
आले आहेत आणि त्याद्वारे मराठीतल्या या एका
झपाटलेल्या आत्मनिमग्न कवींच्या जाणीवेची
हळुवार मर्मस्थळे हळूहळू उलगडलीशी वाटू
लागली आहेत.
दुपारच्या उन्हाने व रात्रीच्या भयाने व्याकूळ
होणारी या कवीची जाणीव सुरुवातीपासूनच
संध्याकाळच्या शोधात भिरभिरत होती, ती आता
सांध्यपर्वात स्थिरावली आहे. प्रदीर्घ काळ मनाचा
पाठलाग करणाऱ्या प्रतीकांचे बळ आणि
संकेतांच्या धुक्याचे दाट सावट सांभाळत ही
कविता आता सांध्यपर्वाच्या रोखाने सखोल
अवगाहन करते आहे. त्या विलक्षण
सांध्यमुहूर्ताच्या सर्व कळा निरखून बघण्याच्या
गंभीर शोधात निमग्न झाली आहे.
म्हणजेच, संध्याकाळचे रूपांतर आता
सांध्यपर्वात झाले आहे. एक छोटासा अल्पजीवी
मुहूर्त पर्व होऊन गेला आहे. हे स्थूलाकडून
सूक्ष्माकडे जाणे की सूक्ष्मातून स्थूलाकडे? कवी
म्हणेल, या स्थूल-सूक्ष्म भेदामध्येही कुठेतरी
असेलच ना एक लहानसा संधिकाल? तो
सहजासहजी चिमटीत सापडत नाही म्हणून त्याचा
पाठलागच सोडून द्यायचा काय?
Only 2 left in stock
| Author | Grace |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171855247 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.