Sale!

कावळे उडाले स्वामी / Kawale Udale Swami

310.00

मुली म्हणजे माझ्या परसातील निपज. माझ्या अंगणातील अलवार, कोवळी समज, म्हणून मी आणि फक्त मीच
बाहुल्यांसंबंधी अधिकृतपणे बोलू शकतो. मायेच्या उत्सवी जाग्रणात नीज हरवून बसलेल्या बाहुल्यांना
तारांगणशैलीच्या खेळातून उचलून बाजूला ठेवू शकतो मी. तरीही ऐकून घे तू पूर्वाश्रमीच्या माझ्या साजणी.
ऐकून घे तू बाहुल्यांपेक्षाही मूलींना समुद्रात ढकलून देणे सोपे असते. बेटांवरून ढकलून देणे जास्त सोपे असते.
बाहुल्यांना ढकलून देणे अशक्य नसते पण अवघड मात्र जरूर असते. मूली अवजड असल्याने तक्रार न करता
निमूट बुडून जातात समुद्रात… बुडताना त्या बेटाचे कृतज्ञतापूर्वक स्मरणही करतात. बेटात अडकलेली, बेटाची
सजीव व थरथरती इच्छा बेटावरच गुप्तपणे फेकून देतात मुली…. बाहुल्या अवजड नसतात. हलक्याच असतात
त्या. कुणालाही याची जाणीव नाही; पण बाई! मी तुला खरेच सांगतो आहे. ऐक ते. जीव लावून ऐक. बाहुल्यांचे
समीरसख्य हे दैवी गुपित आहे. त्याच्या कुळातील पहिल्या पुरुषाच्या हातून ते गुपित धसमुसळेपणाने निसटले
आणि वाऱ्यात मिसळून गेले. निनावी होऊन गेले. म्हणूनच बाहुल्यांना आदिपुरुषाला उघडउघड शह देऊन,
त्याला उद्दामपणे टाळून समीरसख्य साधता येते. बाहुल्या बुडतीच्या सर्व तरंगांना कराराने सांभाळून असतात.
यालाच त्यांची स्वप्नशालीन सरलता म्हणातात! म्हणून तर त्या स्वतंत्रपणे बुडू शकत नाहीत. बुडणारी प्रत्येक
अवजड मुलगी, परकराच्या ओच्यात एकेक बाहली दडवून समुद्रात बुडून जात असते. मुलींचे जडसत्य तळाशी
निजले की त्यांच्या परकराच्या ओच्यातून हळूच बाहुल्या तरगत समुद्राच्या पृष्ठभागावर येतात. तिथे त्यांचा
सखा समीर उभा असतो. त्याच्यात त्या मिसळून तडक दुसऱ्या मुलींच्या शोधात पुन्हा निघून जातात…

देहशिल्याचा अपभ्रंश
मितवा

Out of stock

Additional information

Author

Grace

Binding

Paperback

ISBN

9788171858880

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कावळे उडाले स्वामी / Kawale Udale Swami”

Your email address will not be published. Required fields are marked *