Additional information
Author | G. A. Kulkarni |
---|---|
Binding | Paperback |
ISBN | 9788171852710 |
Language | Marathi |
Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹325.00
जी. एं. नी काय केले आणि काय दिले? प्रथम म्हणजे त्यांनी साहित्याशी असणाऱ्या अविभाज्य निष्ठेचा आदर्श स्वतःसाठी आणि वाचकांसाठी घालून दिला. ज्या काळात साहित्यिक अभिरुची गढूळ आणि सवंग होत चालली होती त्या काळात या आदर्शाने आश्चर्ययुक्त भीती निर्माण केली. ज्यांना ती पेलवली नाही त्यांनी तिच्याकडे सवंग तुच्छतेने अगर छटेल उपहासाने पहिले. अन्य रंजक माध्यमांपेक्षा साहित्य ही वेगळी गोष्ट आहे, ती एकप्रकारची ध्यानधारणा आहे. काही प्रतिभावान प्राण्यांच्या बाबतीत तोच अलौकिक आनंदाचा आणि मोक्षाचा मार्ग आहे असा त्यांचा अनुभव होता. काही वाचकांपर्यंत तो त्यांनी आपल्या कथासाहित्यातून पोहचविला. जी. एं.नी कथेचा एक समावेशक आणि मूलगामी बंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लोककथा, बोधकथा, दृष्टांतकथा, रूपकथा, संसारकथा, मनोविश्लेषण करणारी नवकथा हे सर्व आकार आत्मसात करून आपले समृद्ध रूप सिद्ध करणारी मराठी कथा त्यांनी निर्माण केली. नवकथा त्यांनी पुढे नेली का? असा प्रश्न कधी कधी विचारला जातो. या प्रकारचा धाटसापेक्ष आणि काळसापेक्ष विचार अप्रस्तुत ठरावा अशी संपन्न सार्थकता कथारुपाला देण्याचा जी. एं.चा प्रयत्न होता. कथारूपाचे त्यांचे चिंतन वेगळ्या पातळीवर चाललेले होते. कथेचा आकार म्हणजे कथेच्या आशयगर्भाचे यथार्थ आकलन आणि आविष्कार अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या दृष्टीने आकार हे केवळ साहित्यिक मूल्य नव्हते; तर ते एक आध्यात्मिक मूल्य म्हणून त्यांना जाणवत असावे. जी. ए.ची कथासाधना ही जीवनार्थाची साधना होती.
Author | G. A. Kulkarni |
---|---|
Binding | Paperback |
ISBN | 9788171852710 |
Language | Marathi |
Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.