Sale!

प्रेमा तुझा रंग कसा ? / Prema Tujha Rang Kasa ?

₹120.00

प्रेमा, तुझा रंग कसा? पहिला उत्कट, आंधळ्या ओढीचा गुलाबी रंग, नंतरच्या रुसणा-रागावण्याचा लाल रंग, पुढच्या कडू भांडणाचा काळा रंग – सारे प्रेमाचेच रंग ! अनुराग, राग, विरह, कलह – या सार्‍या प्रेमाच्याच अटळ अवस्था ! प्रेम ही मोठी उदात्त भावना खरीच पण तिला विवाहचं व्यापारी रूप आलं की अनेक विसंगती प्रगट होतात…. उदात्तातली विसंगती – ,जे ‘मोठ’ त्याचं ‘खोटेपण’ म्हणजे विनोदी लेखणीच्या चेष्टांना भरपूर अवसर देणारं आंगणच ! प्रा. वसंत कानेटकरांनी आपल्या पहिल्या विनोदी नाटकासाठी प्रेमाच्या बदलत्या रंगाचा विषय निवडण्यात अव्वल दर्जाची प्रतिभा व्यक्त केली आहे. विषयाची चतुर निवड केली नाटककाराने अर्धी लढाई जिंकली म्हणतात. बाकीची अर्धी लढाई जिंकण्यासाठी जरूरी असते, आवश्य ती रंगत साधून विषय खेळविण्याची. हे चातुर्यही प्रा. वसंत कानिटकर यांनी भरपूर दाखवलं आहे. फार्सच्या सरहद्दिला मधून मधून स्पर्श करणाऱ्या या नाटकातल्या विनोदगर्भ उपहासाला सहानुभूतीची झालर सतत लागलेली असल्यामुळे ठिकठिकाणी मोठे बहारीचे रंग उसळले आहेत…. स्त्री पुरुषांच्या आकर्षणाचं आणि प्रातीचं नाटक जगाच्या रंगभूमीवर सतत चाललेलं आहे आणि चालणार आहे. ते सुरू झालं आणि संपणार केव्हा ते सांगता येणार नाही, असा या नाटकाचा संदेश आहे. खेळकर – क्कचित अवखळ शैलीनं लेखकाने रंगविला आहे. की त्याची ही हास्यप्रधान नाट्यकृती सुरू केव्हा झाली आणि केव्हा संपली ते ‘हशा आणि टाळ्यां’ च्या जल्लोषात प्रेक्षकांना कळणार सुद्धा नाही!

Out of stock

Categories: ,

Additional information

Author

Vasant Shankar Kanetkar

Binding

Paperback

ISBN

9788171850204

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रेमा तुझा रंग कसा ? / Prema Tujha Rang Kasa ?”

Your email address will not be published. Required fields are marked *