Sale!

लमाण / Lamaan

536.00

नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, विचार स्वातंत्र्याची चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सार्वजनिक महत्त्वाच्या कामांत आघाडीवर राहणारे आणि सामाजिक कृतज्ञता निधीला नेतृत्त्व देणारे डॉक्टर श्रीराम लागू आपल्या नाटकी जीवनाला खणखणीत शब्दरूप देत आहेत. नटसम्राटमध्ये गणपतराव बेलवलकर सांगतात, ”संदेश नाटककाराने द्यायचा असतो. आम्ही फक्त लमाण. इकडचा माल तिकडे टाकणारे.” याच विनयातून लागूंनी आत्मचरित्राचे नाव लमाण ठेवले.

लमाणमध्ये डॉक्टरांनी नट कसा असावा याची व्याख्या दिली आहे. ‘ऍथलीट’ असण्यासाठी त्याने सातत्याने शरीराची काळजी घेतली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे हे जसे आवश्यक आहे तसेच ‘फिलोसॉफर’ असण्यासाठी सातत्याने वाचन, मनन, चिंतन करत राहिले पाहिजे. भोवतालच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितींचे डोळस भान ठेवून तिच्याशी आपली नाळ जोडली पाहिजे. आपल्या जीवनविषयक जाणिवा अधिक समृद्ध, संपन्न करत राहिले पाहिजे. कलावंताने आपापला हस्तिदंती मनोरा बांधून त्यात बंदिवान होऊन राहता कामा नये. त्याने जास्तीत जास्त जीवनाभिमुख राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या आणि यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी डॉक्टरांनी लमाणमध्ये सविस्तर सांगितल्या आहेत.

Additional information

Author

Shreeram Lagoo

Binding

Hard bound

ISBN

9788171858989

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लमाण / Lamaan”

Your email address will not be published. Required fields are marked *