Ayurvediya Jeevanshaili: Arogyachi Gurukilli / आयुर्वेदीय जीवनशैली : आरोग्याची गुरुकिल्ली

जीवनशैली हा सध्याच्या काळात अत्यंत जिव्हाळ्याचा विषय। आरोग्य टिकविण्यासाठी, रोगांना दूर ठेवण्यासाठी, त्यातून बरे होण्यासाठी जीवनशैली हा मोठा आधार आहे. दुर्दैवाने कॅन्सर सारखे जीवघेणे आजार सर्व समाजाला ग्रासत असताना, त्याचे मूळ कारण असणाऱ्या जीवनशैलीकडे डॉक्टर आणि समाज या दोघांचे दुर्लक्ष होत आहे. आरोग्यसंपन्न दीर्घ आयुष्यासाठी आयुर्वेदानुसार जीवनशैली कशी असावी याचे उत्तम मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते. जीवघेण्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी, इतकेच नव्हे तर त्यातून पुस्तकात सुचविल्याप्रमाणे कृती आवश्यक.

सर्वांना दीर्घ आयुरारोग्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना!

वैद्य दिलीप गाडगीळ हे १९८० सालापासून आयुर्वेदीय उपचार करीत असून मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे आणि आयुर्वेद आणि एककृत औषध संस्था, बंगलोर येथे आयुर्वेदिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. संस्कृत आणि आयुर्वेद या क्षेत्रात त्यांचे विशेष प्राविण्य आहे. कर्करोग, हृदयरोग आणि मूत्रसंस्थेच्या गंभीर समस्यांवरील निदान आणि आयुर्वेदिक उपचार, या क्षेत्रातील संशोधनाकरीता त्यांनी भरीव योगदान दिले आहे.

‘आयुर्वेद समज गैरसमज’ आणि ‘आयुर्वेदिय हितोपदेश’ अशा विविध पुस्तकांचे त्यांनी संपादन आणि लेखन केले आहे. संस्कृत व्याकरणावरील ‘प्रारंभिक पाणिनीयम’ आणि ‘लघु सिद्धांत कौमुदी’ ही पुस्तके देखील त्यांनी लिहिली आहेत. त्यांना के, वैद्य शिवनाथ शर्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे,

This product is currently out of stock and unavailable.

Additional information

Author

Dr. Vd. Dilip Gadgil

Binding

Paperback

ISBN

9788188569946

Language

Marathi

Publication

Indus Source Books

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ayurvediya Jeevanshaili: Arogyachi Gurukilli / आयुर्वेदीय जीवनशैली : आरोग्याची गुरुकिल्ली”

Your email address will not be published. Required fields are marked *