Sale!

Mahad : Nit Roj Chhedala Jat Asalela Dharmsangar ( महाड : नित रोज छेडला जात असलेला धर्मसंगर )

200.00

भारताच्या राष्ट्रीयत्वाची व राष्ट्रवादाची जी परीकल्पना स्पृश्य हिंदू नेत्यांनी बनवली होती, तिला बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालील महाड सत्याग्रहाने छेद देत, भारताच्या राष्ट्रवादाला वास्तव बनवण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्याची लढाई सर्वसमावेशक असली पाहिजे, आणि ती जर सर्वसमावेशक नसेल, तर ती स्वातंत्र्याची नव्हे, तर फक्त विशेषाधिकारांची लढाई ठरेल; बाकी सगळं केवळ सोंग ठरेल. बाबासाहेबांचा विरोध ब्रिटिशांविरुद्ध सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीला नवहता, तर अशा खोट्या स्वरूपांच्या लढायांना होता. हा नैतिक फरक जात-अंधळ्या इतिहासकारांना व संशोधक अभ्यासकांना लक्षात आला नाही. गांधीप्रणीत दांडी यात्रा जशी राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते, तिच्यावर चर्चा होते; तशीच महाड सत्याग्रहावर मात्र चर्चा होत नाही, किंवा त्याकडे सम्यक दृष्टीने पाहिले जात नाही. अस्पृश्यांच्या गावकुसाबाहेरील वस्त्यांप्रमाणेच अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या इतिहासालाही कोपऱ्यात ठेवून दुर्लक्षित करण्याचा सूडबुद्धीने केलेला प्रयत्न आहे. प्रस्तुत लेखक बोज्जा धारकम यांनी या विषयाकडे नेमके लक्ष वेधले आहे. काहींना हे फक्त तुलना वाटेल, परंतु या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी दांडी यात्रा आणि महाड सत्याग्रह यांची तुलना केलेली नाही; तर या दोहोंमधील नैतिक फरक व प्रत्यक्ष सामाजिक-राजकीय आव्हानांचे स्वरूप नेमके काय होते आणि ते दोन नेत्यांनी कसे हाताळले, यावर सखोल चर्चा केली आहे.

Additional information

Author

Bojja Tharakam ( Translated : Rahul Pagare )

Binding

Paperback

ISBN

9787701917783

Language

Marathi

Publication

Dakhkhan Prakashan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mahad : Nit Roj Chhedala Jat Asalela Dharmsangar ( महाड : नित रोज छेडला जात असलेला धर्मसंगर )”

Your email address will not be published. Required fields are marked *