Additional information
| Author | Vijay Tendulkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171858248 |
| Language | Marathi |
₹225.00
विजय तेंडुलकरांच्या नाटकांत, एकांकिकांत नाटयाशयाबरोबरच तंत्र व शैलीमध्ये वेगळेपणा आणणारी, पारंपरिक नाटयतंत्राची मोडतोड करून नावीन्य शोधणारी, विषय वेगळेपणा पोसणारी, सुंदरतेबरोबरच कुरूपतेच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी त्यांची प्रतिभा निरनिराळे प्रयोग करीत परखड वास्तव आपल्यासमोर आणत राहते.
अशा कलाकृतींच्या शोधात असलेल्या कलावंताना, नाट्यसंस्थांना, अभ्यासू-जिज्ञासू वाचकांना सातत्याने नवीन अनुभव देणाऱ्या या एकांकिका तीन भागांत एकत्रित मिळण्याचा योग आला आहे.
तिसऱ्या भागात ‘थीफ! पोलीस!’ सारख्या हास्यरसप्रधान चित्रगुप्त, अ चित्रगुप्त !’ सारख्या आधुनिक तंत्रातील फार्सिकल स्वरूपाच्या, तर निव्वळ स्वप्निल रंजनिका म्हणून काही खरं नव्हे!’ सारख्या एकांकिका एकत्रित केल्या आहेत. याशिवाय ‘ब्रह्मांडाची पोकळी आणि अवकाशातील पोल’ सारख्या अप्रकाशित एकांकिकांही प्रथमच बाचकांना उपलब्ध होत आहेत.
या भागातील एकांकिका
• काही खरं नव्हे!
• दाणादाण
• अंधेरनगरीतला कंटाळा दिन
• थीफ! पोलीस
• एकेकाचा आजार
• चित्रगुप्त, अहो चित्रगुप्त !
• ब्रह्मांडातील पोकळी आणि
• बिचारे अप्पा बंड करतात
• खलित्यांची लढाई (दुसरी)
• अवकाशाच्या आकाशातील पोल
Out of stock
| Author | Vijay Tendulkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171858248 |
| Language | Marathi |
Reviews
There are no reviews yet.