Sale!

Satish Alekar Yanchya Nau Natkancha Sanch | सतीश आळेकर यांच्या नऊ नाटकांचा संच

1,350.00

आधुनिक मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या काही महत्त्वाच्या नाट्यकारांमध्ये महेश एलकुंचवार आणि विजय तेंडुलकर यांच्या बरोबरीने नाव घेतले जाते ते सतीश आळेकर यांचे.

या संचात आळेकरांच्या ‘महानिर्वाण’ आणि ‘बेगम बर्वे’ या गाजलेल्या नाटकांसह ‘महापूर’, ‘अतिरेकी’, ‘पिढीजात / मिकी आणि मेमसाहेब’, ‘दुसरा सामना’, ‘शनिवार रविवार’ या नाटकांबरोबरच ‘झुलता पूल आणि इतर एकांकिका’ आणि ‘आधारित एकांकिका’ या दोन एकांकिका संग्रहांचाही समावेश आहे.

बोलीभाषा, लोककला यांचा खुबीने केलेला वापर, भाषेतील तिरकासपणातून साधलेला ब्लॅक ह्युमर ही आळेकरांच्या नाटकाची वैशिष्ट्ये. भारतीय रंगभूमीवर निषिद्ध मानला गेलेला ‘मृत्यू’ हा विषय घेऊन लिहिलेले ‘महानिर्वाण’ हे आळेकरांचे महत्त्वाचे नाटक. मृत्यू ही इतर घटनांप्रमाणेच जणू एक दैनंदिन घटनाच आहे असे दृश्य निर्माण केल्याने मृत्यूभोवतालच्या भयावहतेलाच छेद बसतो. ‘बेगम बर्वे’ हे आळेकरांचे आणखी एक गाजलेले नाटक. वैयक्तिक शारीर-मानस असोशी, साकार न झालेल्या इच्छा, चिरंतन अव्याहत वेदना, कोंडलेल्या लैंगिकता यांवर भाष्य करणारे हे नाटक सामाजिक दडपणे, शोषितांचे अस्फुट आक्रोश, मध्यमवर्गीय संकुचित जाणिवा, आर्थिक दमन यांवरही प्रहार करते.

‘महापूर’, ‘अतिरेकी’, ‘मिकी आणि मेमसाहेब’, ‘दुसरा सामना’, ‘शनिवार रविवार’ या इतर नाटकांमध्ये ‘पिढीजात’ हे आळेकरांचे सगळ्यात अलीकडचे अतिशय महत्त्वाचे नाटक. आळेकरी शैलीची सर्व वैशिष्ट्ये असलेले हे नाटक एकाच राजकीय, सामाजिक, कौटुंबिक पातळीवरच्या नैतिक घसरणीविषयी बोलते, आणि पुन्हा या घसरणीबद्दल टाहो न फोडता, नीतीमत्तेचे डांगोरे न पिटता या पेचाला सहृदयतेने सामोरे जाते, त्यातली गोची समजून घेते आणि या काळातल्या ‘बाप’ पिढीची शोकांतिका मांडत पुढल्या पिढीचे न-नैतिक होणेही दाखवते.

नव्या स्वरूपातील, नव्या मुखपृष्ठांसह उत्तम निर्मितीमूल्ये असलेल्या एकूण नऊ नाटकांचा हा संच नाट्य-अभ्य्साकांसाठी अतिशय महत्त्वाच आहे”

Out of stock

Categories: ,

Additional information

Author

Satish Alekar

Binding

Paperback

ISBN

9788195832408

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Satish Alekar Yanchya Nau Natkancha Sanch | सतीश आळेकर यांच्या नऊ नाटकांचा संच”

Your email address will not be published. Required fields are marked *