Additional information
| Author | Gulam Mohammed Sheikh |
|---|---|
| Binding | Hard bound |
| ISBN | 9788179919262 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹1,350.00
‘दृश्यकला’ या ग्रंथाविषयी
अनेक कला आणि ज्ञानशाखा यांचा परिचय सर्वसामान्य वाचकांना करून द्यावा या उद्देशाने वल्लभ विद्यानगरच्या सरदार पटेल विद्यापीठाने ‘ज्ञानगंगोत्री’ या मालिकेअंतर्गत विविध विषयांवरच्या अनेक उत्तम ग्रंथांचं प्रकाशन केलं. त्या त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींनी या ग्रंथांचं लेखन केलं असून ‘दृश्यकला’ हा या मालिकेतला तिसावा ग्रंथ आहे.
जागतिक चित्र, शिल्प आणि स्थापत्य या कलांचा इतिहास या ग्रंथात वाचायला मिळतो. गुलाम मोहम्मद शेख हे या ग्रंथाचे प्रमुख संपादक असून कला-समीक्षक आणि अध्यापक असलेले शिरीष पंचाल हे सहसंपादक आहेत. स्वतः कलाकार असलेले आणि जागतिक-भारतीय कलेचा सखोल अभ्यास असलेले जयदेव शुक्ल, उषाकांत मेहता, गौरी पारिमु, ज्योति भट्ट, दीपक कन्नल, रतन पारिमु, शिरीष पंचाल, सुरेश शेठ, नयना दलाल व भारती दलाल यांनी या ग्रंथासाठी लेखन केलं आहे.
कलेतील सर्वच प्रवाहांचा आस्वाद घेण्याची मोकळीक वाचकांना मिळावी या हेतूने, एखाद्या कलाविचाराला केंद्रस्थानी ठेवून त्या अनुषंगाने इतर प्रवाहांचा मागोवा घेण्याऐवजी पूर्व-पश्चिमेतील कलेचं तपशीलवार वर्णन करत विविध कलाप्रवाहांचं विवेचन करण्यावर या ग्रंथात भर दिला आहे. केवळ तपशीलवार वर्णनावर अवलंबून न राहता या ग्रंथात भरपूर चित्रंही दिली आहेत. लेख वाचताना या चित्रांचा उपयोग संदर्भ म्हणून होतोच पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ही चित्रं पाहून वाचकाची उत्सुकता चाळवली जावी आणि त्या चित्रांच्या मूळ कृती शोधण्याची, न्याहाळण्याची प्रेरणा त्याला मिळावी हा ही चित्रं देण्यामागचा संपादकांचा हेतू आहे.
या ग्रंथाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पूर्व आणि पश्चिमेच्या कलेला एकसमान पातळीवर ठेवून त्यांचा विचार करण्यात आला आहे. शिवाय आशियाई कलांकडे धर्माधारित दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी त्यांचंही वर्गीकरण भौगोलिक खंडांमध्ये केल्यामुळे या कलांकडे बघण्याचा एक वेगळा आणि अधिक निकोप दृष्टिकोन वाचकाला मिळतो.
मूळ गुजराती ग्रंथाची मराठी आवृत्ती प्रकाशित करताना त्यात एकूण भारतीय कलेत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या ‘बॉम्बे स्कूल’वर, कलासमीक्षक माधव इमारते यांनी लिहिलेला एक लेख समाविष्ट केला आहे.
फ्रेंच कला-तज्ज्ञ आंद्रे मालरो (Andre Malraux) यांनी कलाविषयक ग्रंथांना भिंतींशिवायचं संग्रहालय असं म्हटलं आहे. ‘दृश्यकला’ हा ग्रंथ वाचताना मालरो यांच्या या विधानाचा पुरेपूर प्रत्यय येईल.
एकूण 512 पृष्ठांच्या 7” x 9.5” आकाराच्या पुठ्ठा बांधणी असलेल्या या ग्रंथात देश-विदेशातली महत्त्वाची पेंटिंग्ज, शिल्पाकृती, इमारती, लोककलाकृती यांच्या 350 छायाचित्रांचा समावेश केला आहे. स्वतः गुलाम मोहम्मद शेख यांनी खास या ग्रंथासाठी तयार केलेलं कलात्मक मुखपृष्ठ या पुस्तकाला खास सौंदर्य प्राप्त करून देतं.
Out of stock
| Author | Gulam Mohammed Sheikh |
|---|---|
| Binding | Hard bound |
| ISBN | 9788179919262 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.