Sale!

देखणी / Dekhani

135.00

व्यक्तिगत संदर्भांना आत्मनिष्ठेच्या दृष्टिकोनातून पाहिले तरी एवढ्या व्यापकपणे सामान्यीकरण करून त्यातील भावसत्य वैश्विक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणे, ही गोष्ट भालचंद्र नेमाडेंना एकूणच चांगली साधलेली आहे. स्वत:च्या जीवनातील व्यक्तिगत संदर्भाना विशुद्ध भावकाव्याच्या पातळीवर नेणारा असा कवी आजच्या काळात क्वचितच आढळतो.

नेमाडेंची कविता प्रामुख्याने आत्मचरित्रात्मक स्वरूपाची असल्याने रोजच्या जगण्याचे ऊर्ध्वपातन त्यांच्या कवितेत झालेले दिसते. त्यांच्या कवितेतून बहुस्तरीय आत्मचरित्राचा निर्देश होतो, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. त्यांची लेखनवृत्ती ही स्वत:च्या जगण्याचे थेट शब्दांकन करणारी आहे व त्यामुळे त्यामध्ये अस्तित्वलक्ष्यित्व हे सूत्र आपोआपच गुंफलेले आहे. परंतु हा जो अस्तित्वाचा आणि परात्मभावाचा अनुभव कवी व्यक्त करतो, त्याच्या तुटलेपणाच्या जाणिवेला एक आध्यात्मिक अंगही आहे. त्यांचे संवेदन विपरीत स्थितीने थोडेसे भयभीतही होते. पण तरीदु:ख पचवण्याची शक्ती त्यांनी प्राप्त केली आहे. नेमाडेंच्या ह्या जाणिवा फारच वेगळ्या आहेत. समकालीन सामाजिक, सांस्कृतिक आणि मूल्य-अमूल्यात्मक वास्तवाच्या युगजाणिवा नेमाडेंच्या कवितेत फार चांगल्या प्रकारे आविष्कृत होतात.

– जयश्री शास्त्री
‘देखाणीतील काव्यविश्व’
विजय प्रकाशन, नागपुर,२००७

Categories: ,

Additional information

Author

Bhalchandra Nemade

Binding

Paperback

ISBN

9788171855896

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “देखणी / Dekhani”

Your email address will not be published. Required fields are marked *