Sale!

पायी चालणार / Payee Chalnar

200.00

सभोवताली कविताविषयक भयंकर कोलाहल माजलेला असताना स्वतःचा निर्मम, निर्मळ अंत:स्वर जपत संथगतीने कविता लिहिणारे प्रफुल्ल शिलेदार आजच्या मराठी कवितेतील महत्त्वाचे कवी आहेत. त्यांच्या कवितेचा स्वपासून समष्टीकडे होणारा
प्रवास त्यांच्या सर्वच कवितांमधून अधोरेखित होत जातो. जगण्याविषयी प्रचंड कुतूहल असणारी ही कविता मानवी जगण्याचा तळ शोधण्याची आकांक्षा बाळगते. त्यांच्या बहुपेडी आशयसूत्रांना अर्थाचे बहुविध स्तर प्रसविण्याकरिता आवश्यक असे अनोखे
आविष्कारतंत्र त्यांच्या कवितेला सर्वच रूढ समकालीन कवितेपासून अलिप्त ठेवून स्वतंत्र वाट चोखाळावयास लावते. ही कविता आवाजी नाही आणि आत्ममग्नही नाही. ही कविता संथपणे वाचणाऱ्याच्या मेंदूचा कब्जा घेऊन मानवी अस्तित्वाच्या साऱ्या
शक्यता पुन्हा पुन्हा तपासून घेण्यास भाग पाडते. जगण्याचे अनंत प्रश्न केंद्रस्थानी आणून झालेल्या गुंतावळीचा स्वशोध स्वतंत्रपणे घेण्यास वाचकाला बळ पुरवते. ही कविता स्वशोधाची, समूहशोधाची आणि पर्यायाने माणसाच्या शोधाची
कविता आहे.
या कवितेला प्रतिमा, प्रतीके, गूढता यांचा सोस परवडत नाही. ती व्यवहार भाषेतील सहज सुलभ शब्दांना आपल्या आत मुक्तद्वार ठेवून त्यांना आपल्या विश्वशोधाच्या भिंगाने भारीत करून थक्क करणारे नवे अस्तित्व प्राप्त करून देते. हे होत असताना त्यात कारागिरीचा अंशही न सापडावा यातून प्रफुल्ल शिलेदार या प्रतिभासंपन्न माणसाच्या जगण्यातील तत्त्वनिष्ठा आणि कवितेवरील अतयं निष्ठा प्रतीत होते. या कवितेला सर्वच बेगडी गोष्टीना, कृतक तंत्राना आणि अवजड भाषिक भुयारांना सहज
टाळून मातीत घट्ट पाय रोवून उभे राहता येते ही अचंबित करणारी गोष्ट आहे. हे सारे कदाचित त्यांनी आपली कवितेची सारी परंपरा गाढ निष्ठेने पचविल्यामुळे शक्य झाले असावे. या कवितेला मिरवण्याची हौस नाही त्याचप्रमाणे अकारण चमकण्याची
आकांक्षा नाही. आपल्या वाट्याला कुणी यावे म्हणून शिणगार नाही किंवा टाळावे म्हणून हैदोस नाही; पण भेटणाऱ्याला बोट धरून अर्थांची जगड्व्याळ भुयारे पार करीत किनाऱ्यावर उभे करून या नव्या प्रदेशाचा अर्थ तूच लावायला हवा अशी सक्ती करणारी
ही कविता आहे. अशी कविता आज क्वचितच वाचावयास मिळते, हे मात्र निश्चित.

-राजन गवस

Only 2 left in stock

Categories: ,

Additional information

Author

Prafull Shiledar

Binding

Paperback

ISBN

9788179918982

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पायी चालणार / Payee Chalnar”

Your email address will not be published. Required fields are marked *