Additional information
| Author | Grace |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171852697 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹340.00
मितवा… हे कवी ग्रेस यांचे आत्मपर ललितबंध
आहेत. आत्मपरतेमुळे त्यात आत्मचरित्रात्मक अंश
प्राधान्याने आहेतच; पण चरित्रगत वास्तवात
नेहमीच सत्य, स्वप्न व भास यांचे जटिल संमिश्रण
होत गेल्यामुळे कविप्रतिभेचा एक वेगळाच खाजगी
आविष्कार या ललितबंधांमधून जाणवत राहतो.
उदासी व असोशीच्या आवर्तामधे मृगजळाची
अभंग तृष्णा घुसळून निघावी तशी कवी ग्रेस यांची भाषा
अनुभवांच्या उत्कट स्तरांना छेदत छेदत ‘भासचक्राचे
तोल सांभाळताना दिसते. त्यामुळे क्वचित स्वत:चेच
उदात्तीकरण, क्वचित स्वत:चाच निषेध अशा
परस्परविरोधी तणावांमधून कवीचा कठोर
आत्मशोध त्यांच्या संवेदनशील मनाच्या अवघड
चढउतारांची साक्ष पटवीत राहतो. ‘मी’
आणि ‘तू’ म्हणजेच कवी आणि कवीचे
आयुष्य यांच्या अनेकपदरी संबंधातून उद्भवणाऱ्या
संघर्ष-नाट्यातील अतिशय उत्कट, आर्त आणि गंभीर
स्वगत म्हणजे ‘मितवा.
Out of stock
| Author | Grace |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171852697 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.