Sale!

खुंदळघास / Khundalghas

₹250.00

छोट्या गावातील कुटुंबातले संस्कार आणि ग्रामीण जीवनाचे अस्सल रंग ल्यालेले प्रगल्भ मन यांच्या आधारे सदानंद देशमुखांनी आपले सर्व लेखन केले. केवळ काल्पनिक आयुष्य उभे करण्यापेक्षा देशमुख आपल्या कथा-कादंबऱ्यातून ग्रामीण प्रश्नांना आणि भोवतालच्या वास्तवाला थेट भिडताना दिसतात. अतिशय डोळसपणे, निर्भीडपणे, ताकदीने मांडलेले हे अनुभव ‘खुंदळघास’ या कथासंग्रहात अधिकच जिवंत होतात. लहानपणापासून शेतात राबताना, अनेक अडथळे पार करत शिक्षण पूर्ण करताना आणि त्यानंतर ग्रामीण भागातच वास्तव्य करून राहताना माणसांमधल्या अनेक वृत्ती-प्रवृत्ती त्यांना अनुभवायला मिळाल्या, त्याच त्यांनी आपल्या लेखनामधून वाचकांपुढे मांडल्या.
‘खुंदळघास’ हा अस्सल ग्रामीण शब्द शेतीवाडी करताना वन्यप्राणी, जनावरे यांच्यामुळे होणाऱ्या त्रासाविषयी शेतकरी नेहमीच वापरतात. उन्हातान्हात, पावसापाण्यात खपून पेरलेले शेत तयार होऊन कापणीला येते आणि अचानक अशा पिकांवर वानरे, रानडुकरे, हरणे अशा प्राण्यांचा घाला पडतो. हातातोंडाशी आलेल्या पिकांत धुडगूस घालून हे प्राणी पिकाचा घास घेतात, ते तुडवतात, खुंदळतात यावरून ‘खुंदळघास’ हा शब्द प्रचारात आला आहे. एका प्रकृतीच्या आणि वेदनेचे सूत्र असलेल्या या संग्रहातील व्यक्तिरेखांचासुद्धा त्यांच्या वाट्याला येणाऱ्या विपरिततेने, अभावग्रस्त प्रतिकूल परिस्थितीने असाच ‘खुंदळघास’ केलेला दिसतो.

Only 1 left in stock

Categories: ,

Additional information

Author

Sadanand Deshmukh

Binding

Paperback

ISBN

9788171859603

Language

Marathi

Publication

Popular Prakashan Pvt. Ltd.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “खुंदळघास / Khundalghas”

Your email address will not be published. Required fields are marked *