Additional information
| Author | हरिवंशराय बच्चन (वसंत केशव पाटील) / Harivansh Rai Bachchan (vasant keshav patil) |
|---|---|
| Binding | Paperback |
| Language | Marathi |
| Publication | Sanskruti Prakashan |
₹450.00
डॉ. हरिवंशराय बच्चन
हिंदी साहित्यातील एक बहुरंगी व्यक्तिमत्व. हालावादी कवी, शैलीदार गद्यलेखक, यशस्वी अनुवादक, साक्षेपी संपादक, इंग्रजीचे प्राध्यापक, केंब्रिज विद्यापीठातून इंग्रजीची डॉक्टरेट मिळविणारे पहिले भारतीय, संसदसदस्य, अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी, नेहरू कुटुंबीयांचे घनिष्ठ स्नेही, रूपेरी पडद्यावर अभिनयकलेचा सार्वकालिक मानदंड निर्माण करणाऱ्या अमिताभ बच्चनचे पिताश्री इत्यादी विविध लौकिक रुपांत भेटणारा एक अभिजात कलावंत.
त्यांची ही कहाणी.
दिल्लीच्या के.के. बिर्ला प्रतिष्ठानचा तीन लाख रुपयांचा प्रथम सरस्वती पुरस्कार लाभलेली पारदर्शक अशी कलाकृती. अभिजात कवीच्या रसोक्तट गद्याचा तरल अविष्कार. डॉ. हरिवंशराय बच्चन यांना पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासारखा दिग्गज राजकीय नेत्यांच्या दीर्घ स्नेह- सहवास लाभला. महाकवी निराला, पंडित नरेंद्र शर्मा (‘महाभारत’ मालिकेचे मार्गदर्शक) ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी सुमित्रानंदन पंत, दिनकर प्रभूतींशी त्यांची जिव्हाळ्याची मैत्री होती. युरोप आणि आशिया खंडातील अनेक देशांत प्रवास करून तेथील समाज, संस्कृती, साहित्य, संगीत- कलादींचा त्यांनी मनमुराद अनुभव- आस्वाद घेतला. विद्यापीठ आणि केंद्र सरकार ह्यासारख्या नोकरशाहीच्या गडकोटांत राहूनही आपली विशुद्ध संवेदनशीलता कधीही त्यांनी बोथट होऊ दिली नाही. सत्यं- शिवं- सुंदरम् वरील श्रद्धा श्वासोच्छ़श्वासाइतकी मौलिक व मूल्यवान मानून त्यांनी सदैव जपली नि जोपासली… अशा अनेकविध भावपूर्ण घटीतांचे हे
रसार्द आणि हृदयस्पर्शी स्मरण. ही आत्मकहाणी म्हणजे एका संवेदनशील मनाचा आत्मसंवाद; आठवणींच्या सुदूर प्रदेशात घेऊन जाणारा.
Out of stock
| Author | हरिवंशराय बच्चन (वसंत केशव पाटील) / Harivansh Rai Bachchan (vasant keshav patil) |
|---|---|
| Binding | Paperback |
| Language | Marathi |
| Publication | Sanskruti Prakashan |
Reviews
There are no reviews yet.