Sale!

द आंत्रप्रेन्युअर / The Entrepreneur

225.00

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर काय करावं यावर शेकडो पुस्तके मिळतील पण काय करू नये हे कानाला धरून सांगणारं ‘आंत्रप्रन्योर’ हे कदाचित एकमेव पुस्तक असेल!
जिंकाल तर राज्य कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल पण हरलेल्याकडून कोणीच मार्गदर्शन येत नाही…    म्हणून आपण आधी जिंकलं पाहिजे! एवढ्या सोप्या शब्दात स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या युवकांना लेखकाने एक नवा पण अचूक रस्ता दाखवला आहे. तुम्ही स्वत:ला काय समजता यापेक्षा तुमचा बाप तुम्हाला काय समजतो हे महत्त्वाचे आहे!’ या एकाच वाक्यात डोळ्यावर ओढून घेतलेली झापडं खाडकन उघडतात. स्पष्ट सांगायचं म्हणजे अगदी नाकावर चालणाऱ्या, अभ्यास एके अभ्यास करून मोठ्या पदावर सरकारी नोकरी मिळवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तथाकथित ‘स्कॉलर’ साठी नाहीच.
हे पुस्तक आहे स्वत:चा उद्योग उभारण्याची महत्वाकांक्षा ठेवणाऱ्या ‘बिझनेस माईड’ तरुणांसाठी! तात्पुरतं मोटिवेशन हे पेनकिलर गोळीसारखं असतं…अगदी थोड्या वेळापुरतं, मग मोटिवेशन कसं असावं याचं उत्तर म्हणजे ‘द आंत्रप्रन्योर’! ज्याने ‘कॉलेज लाईफ’ जगली आहे किंवा जगत आहे त्या प्रत्येकाला वाटते की ही माझीच कहाणी आहे. ओढून ताणून मिळविलेली डिग्री, शिक्षणानंतर साहेब व्हायचं म्हणून केलेली चझडउ, णझडउ. त्यातून समजलेली ‘औकात’, नंतर नोकरी, अपयश. क्षणोक्षणीचे अपमान, त्यातून आलेलं नैराश्य, त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेले प्रयत्न, नारायण नागबळी सारखे विधी… भरपूर काही मांडलं आहे. यादरम्यान ‘मुलगा आणि वडील’ यांच्यातील नात्याची गुंफण लेखकाने अशी मांडली आहे की, वाचतेवेळी आपल्याला आपलं नातं आठवतं. इथे नकळत डोळे पाणावतात. ज्याला बापाचे अश्रू जपता येतात त्यापासून यश दूर नाही… अप्रतिम असा प्रवास मांडला आहे. नुसतं वाचलंच नाही तर शब्द व शब्द आत्मसात करून अंत:प्रेरणा देणारं ‘द आंत्रप्रन्योर’ हे पुस्तक अंगीकारलं पाहिजे.

Out of stock

Additional information

Author

Sharad Tandale

Binding

Paperback

ISBN

9788193446874

Language

Marathi

Publication

New Era Publishing House

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द आंत्रप्रेन्युअर / The Entrepreneur”

Your email address will not be published. Required fields are marked *