Additional information
| Author | Saumitra |
|---|---|
| Binding | Hard bound |
| ISBN | 9788179919361 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹428.00
आपल्या भयाण एकाकीपणाचे संदर्भ लागू देऊ नयेत
वाचून दाखवू नये कुठलीही कविता
नवीन कविता लिहिल्यावर
कवींनी सांत्वनाला भेटावं
समजूतदारपणे घ्यावा आधार एकमेकांचा
सरपटतांना आत कवितेचा साप
भिनू द्यावं विष स्वत:तही
पण कुणाला डंख मारू नये
कुठेतरी
कधीतरी कविता छापून आल्यावरच
कळावं साऱ्यांना
कवीमध्ये तेव्हाच काही मरून गेल्याचं
आठवणी प्रसंग व्यक्तींचे मृत्यू
डोळ्यांदेखत पचवत
कवीने शांत निश्चल बसून राहावं
स्थितप्रज्ञ रहावं
त्याच्या भवतालची माती
त्याच्या नकळतच ओली होत जावी
आणि आपोआप
गवत उगवत राहावं
| Author | Saumitra |
|---|---|
| Binding | Hard bound |
| ISBN | 9788179919361 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.