Sale!

महाराष्ट्राचे शिल्पकार पट्टे बापूराव / Maharashtrache Shilpkar Patthe Bapurao

140.00

प्रा. चंद्रकुमार नलगे हे मराठीतले ख्यातकीर्त कथाकार आहेत. कथालेखनाचं त्यांचं दालन समृद्ध आहे. बदलत्या खेड्यांचं, तिथल्या नव्या जुन्या माणसांचं, प्रगतीतून प्रसवलेल्या समकालीन प्रश्नांचं चित्रण त्यांनी आपल्या सर्जनशील लेखनातून केलेलं आहे. आधुनिक मराठी ललितगद्यतही त्यांनी मोलाची भर टाकली आहे. ग्रामजीवन आणि ग्रामसंस्कृती यांची वीण त्यांच्या ललितगद्यातून अगदी अनोख्या अंगानं अविष्कार पावलेले आहे. महत्त्वाचे समकालीन लेखक म्हणून त्यांची मान्यता मोठी आहे. दक्षिण महाराष्ट्राचे ‘साने गुरुजी’ असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो !

ग्रामीण आणि दलित साहित्याची निवडक संपादनं त्यांनी सिद्ध करून विद्यापीठीय अभ्यासक्रमाला उंची प्राप्त करून दिली. वाचकांतही ही संपादनं लोकप्रिय आहेत. मोजकेच परंतु मौलिक असं टीकालेखनही त्यांनी केलं. वाड्मयातील नव्या प्रवाहांचे, नव्या जाणिवांचे आकलन त्यांच्या इतिहासलेखनातून फार नीटपणाने येतं.

लोकशाहीर पट्टे बापूराव यांची जीवनगाथा गाणारं हे पुस्तक म्हणजे चरित्र लेखनाची उत्तम पावती आहे. सुबोध आणि रसमय शैलीचा तो नमुना आहे. पठ्ठे बापूराव यांचं जगणं जितकं सर्जनाचं तितकं ते संघर्षाचंही आहे. बंडखोर मनाला बंधन बांधून नाही ठेवू शकत. त्याच्यापोटीही मग खूप काही सोसणं येतं. जगण्यातले सगळे ताण या लेखनात अनुभवता येतात. अशा चरित्राला चतुःसीमा नसतात. पार क्षितिजापर्यंत जावं लागतं. प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी तसा वेध इथं घेतला आहे. लेखनातून मनात उतरणारी ही कहाणी मनात म्हणूनच हृद्य झाली आहे.

Out of stock

Additional information

Author

Prof. Chandrakumar Nalge

Binding

Paperback

Language

Marathi

Publication

Sanskruti Prakashan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्राचे शिल्पकार पट्टे बापूराव / Maharashtrache Shilpkar Patthe Bapurao”

Your email address will not be published. Required fields are marked *