Additional information
| Author | Dr. Suniti Dharwadkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9789382906940 |
| Language | Marathi |
| Publication | Lokvangmaya Griha |
₹225.00
मानवाचे अंती एक गोत्र!
‘विद्यार्थी, शिक्षक, कार्यकर्ते, विज्ञानाची आवड असणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त असे पुस्तक! माझ्या मते ‘उत्क्रांती हा मानवी संकल्पनांमध्ये प्रचंड क्रांती घडवून आणणारा शोध होता. मी त्याला आईनस्टाईनच्या रिलेटिव्हिटी थेअरी’ इतका महत्वाचा मानतो. जीवरसायनशास्त्राचे सखोल ज्ञान असलेल्या डॉ. सुनीती धारवाडकर यांनी प्रस्तुत पुस्तकातून उत्क्रांती प्रक्रिया सहज सुंदर भाषेतून समजावून सांगितली आहे. त्यात मला आवडणारा मुख्य भाग असा की यात उत्क्रांती आणि आनुवंशिकता यांची सांगड उत्कृष्टरित्या उलगडून दाखविली आहे. अनुवंशशास्त्राच्या (जेनेटिक्स) शिवाय उत्क्रांती ही फक्त एक तात्विक गोष्ट राहीली असती. पण आज आपण जेनेटिक्सचा वापर करून उत्क्रांती प्रक्रिया सिद्ध करतो. आणि त्यातून हेही लक्षात येते की जगातील विविध धर्माची, पंथांची आणि जातींची सर्व माणसे जनुकीयदृष्ट्या सारखीच आहेत.सर्व मानवजात ही एकच आहे – होमो सेपियन! ही अतिशय महत्वाची मांडणी या पुस्तकातून केली गेली आहे. सामान्य माणसाच्या मनात असलेल्या उत्क्रांती बद्दलच्या शंकांचे पुराव्यासहित समाधान करण्यात हे पुस्तक यशस्वी ठरलेले आहे. एक अभ्यासपूर्ण आणि तेवढेच रंजक पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल लेखिकेचे व लोकवाङ्मय गृहाचे अभिनंदन!
– अच्युत गोडबोले
‘मानवाचे अंती एक गोन्न!’ एका दृष्टीक्षेपात
. उत्क्रांती प्रक्रियेची उकल.
. सह-उत्क्रांतीचे महत्व.
. उत्क्रांती संशोधनाचे महत्वः औषधीशास्त्र; करोना सारख्या विषाणूंवर लसी
विकसित करण्यासाठी.
. उत्क्रांतीचे कालमापन.
माकडा पासून माणूस झाला? शंका-निरसन.
.मानवाचे अनोखे स्थान.
.आपण जैविक उत्क्रांती बरोबरच सांस्कृतिक उत्क्रांतीची फलश्रुती!
.सह-उत्क्रांतीचे महत्व ओळखत, भेदभावाला तिलांजली देतच आपल्याला
पुढची वाटचाल करायची आहे.
Only 1 left in stock
| Author | Dr. Suniti Dharwadkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9789382906940 |
| Language | Marathi |
| Publication | Lokvangmaya Griha |
Reviews
There are no reviews yet.