Additional information
| Author | Vasant Kanetkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171850358 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹160.00
‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे ऐतिहासिक नाटक, ऐतिहासिक एवढ्याच अर्थाने की त्यातील नाट्यवस्तू इतिहासातून कोरलेली आहे. समाजजीवनातील अंत:स्त्रोत जाणून घेण्याच्या दृष्टीने इतिहास महापुरुषांच्या चरित्राकडे काहीशा अलिप्तपणे पाहतो. पण त्या पुरुषश्रेष्ठांच्या अंतरंगातून वाहणारे माणूसपणाचे सूक्ष्म, कोमल, मधुर झरे यांविषयी त्याला फारसे कर्तव्य दिसत नाही. कलासृष्टीचा व्यापार नेमका याउलट आहे. म्हणून जेथे इतिहास थांबतो तेथे कलासृष्टीचा शोध सुरु होतो.
छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे ही मराठी मनाची लाडकी दैवते. पण छत्रपतींच्या जीवनातील शेवटची चार वर्षे न्याहाळत असताना या थोर पितापुत्रांच्या आयुष्यात ज्या घडामोडी घडल्या तिथेच काळपुरुषाने एका महान शोकांतिकेचा घाट निर्माण करून ठेवला आहे असे दिसते; आणि ध्यानात येते की अवतार अवतारतुल्य कार्य करणारी पितापुत्राची ही जोडी म्हणजे अखेर ‘माणसे’च होती.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वांतून आणि विविधरंगी कर्तृत्वातून माणूस शोधण्याचा हा एक हृदयस्पर्शी आणि मराठी नाथ नाट्यसृष्टीत जवळजवळ पहिलाच प्रयोग.
Out of stock
| Author | Vasant Kanetkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171850358 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.