Sale!

Bhau Padhye Yanchya Shrestha Katha | भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा

₹360.00

“व्यष्टीच्या कोषामधून समष्टीचे दर्शन घडवण्याचे भाऊ पाध्यांचे कलात्मक कौशल्य हाच त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गाभा आहे. भाऊंच्या लेखनात निवेदक ते स्वतः आहेत आणि नाहीतही. त्यांचे प्रत्येक पात्र निवेदनात आपला रास्त हिस्सा घेते, आपली बाजू मांडते. न्यायाधीशाशिवाय चाललेले हे खटले आहेत. परस्परविरोधी दावे करणारे आणि स्वतःची वकिली करणारे लोक, आरोप करणारे, अपराध करणारे, साक्ष देणारे, निकाल देणारे असे अनेक निवेदकांचे स्वर भाऊंच्या लेखनात आपल्या ऐकू येतात. मग कळते की, हा एका समाजाचा गलबला आणि त्यातून येणारा मानवतेचा आवाजच आहे….

..वर्गमुक्त, वर्णमुक्त, लिंगभेदनिरपेक्ष अशी जी मानवतावादी दृष्टी भाऊंच्या लेखनात आहे ती सर्वस्वी सेक्युलर किंवा इहवादी आहे. कोणत्याही राजकीय विचारप्रणालीची ढापणे या दृष्टीला लावलेली नाहीत. कोणतीही विभाजनशील किंवा संकुचित कलात्मक विचारसरणी तिला रंगीत चष्मा चढवत नाही. वाङ्मयाद्वारा जीवनाकृतीचे चित्रण करणे हा एकमेव उद्देश भाऊंच्या वाङ्मयाच्या मुळाशी आहे. व्यक्तीची जीवनाकृती इतर व्यक्तींच्या जीवनाकृतींशी जोडलेली असते आणि ह्यातून समाजाची जीवनाकृती निर्माण होते. मानवी प्रतिभेत समाजाची जीवनाकृती बघण्याची क्षमता आहे. मानवी व्यवहार जरी क्षणभंगुर, अनित्य, अवर्णनीय, चिकित्सेपलीकडचे वाटले तरी त्यांच्या चलच्चित्रणाची क्षमता कलामाध्यमांमध्ये आहे. फार काय, मानवी व्यवहारांमधल्या अव्यक्त किंवा अतिसूक्ष्म परिमाणांचीही प्रातिभिक पुनर्निर्मिती करणे श्रेष्ठ कलावंतांना शक्य असते. भाऊंचे आदर्श गेल्या शतकातले महान रशियन कादंबरीकार आहेत; पण भाऊंनी त्यांचे कोठेही अनुकरण केलेले नाही. भाऊ पूर्णपणे विसाव्या शतकातले महानगरीय भारतीय संवेदनेचे मराठी कादंबरीकारच आहेत.”

दिलीप पुरुषोत्तम चित्रे

In stock

Additional information

Author

Editor : Dilip Purushottam Chitre

Binding

Paperback

ISBN

9789393134486

Language

Marathi

Publication

Lokvangmaya Griha

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bhau Padhye Yanchya Shrestha Katha | भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा”

Your email address will not be published. Required fields are marked *