Additional information
| Author | Dr. Babasaheb Ambedkar |
|---|---|
| Binding | Hard bound |
| ISBN | 9788191097962 |
| Language | Marathi |
| Publication | Vinimay publications |
₹315.00
धर्माची मूलतत्त्वे
माझे असे म्हणणे आहे की :
१. समाजाला एकत्र ठेवण्यासाठी एकतर न्यायपालिकेची मान्यता हवी किया नीतीमत्तेची तरी, हे जर नसेल तर समाजाचे विघटन नक्कीच आहे. समाजात कायद्याचा प्रभाव सीमित असतो. ह्याचा मुख्य उद्देश समाजातील अल्पसंख्यांकांना सामाजिक नियमांच्या कक्षेत आणणे हा आहे. बहुसंख्य समाजाला ह्यातून वगळले आहे कारण ह्या बहुसंख्य समाजाने स्वतःहून नीतीनियमांच्या कक्षेत रहायचे आहे. धर्मातील नीतीतत्त्वांचा उपयोग प्रत्येक समाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला पाहिजे.
२. प्रथमतः धर्माची व्याख्या ही विज्ञानाला अनुसरुनच असायला हवी. असे जर झाले नाही तर लोकांच्या मनात धर्माबद्दल आदर राहणार नाही. मग धर्म हा पट्टेचा विषय होईल व त्याचे समाजाच्या व्यवस्थापनेतील एक मुख्य नियम अशा स्थानाचे अवमूल्यन होईल. त्याला विज्ञानाची कास नसेल तर, दुसऱ्या शब्दात, जर धर्म कार्यक्षम असायला हवा तर तो तर्कनिष्ठ असला पाहिजे आणि तर्क है विज्ञानाचेच दुसरे नाव आहे.
३. धर्म सामाजिक नीतीमत्तेचे नियम म्हणून जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा धर्मानि स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या त्रिसूत्रीला मानायला हवे. धर्माने जर समान जीवनातील ह्या तीन मूलभूत नियमांना मानले नाही तर धर्माचा विनाश अटळ आहे.
४. धर्माने दारिद्र्याला पावित्र्य देऊ नये वा त्याचे उदात्तीकरण करू नये. ज्यांच्याकडे ऐश्वर्य आहे त्यांनी त्याचा त्याग केला तर ते उत्तम आहेच, पण म्हणून आपण दरिद्रता उत्तम आहे म्हणता कामा नये. असे म्हणणे म्हणजे धर्माचे विद्रुपीकरण ही व असे झाले तर पाप व गुन्हे वाढतील व पृथ्वीवर नरक अवतरेल.
‘बौद्ध धर्म’ हा एक असा धर्म आहे जो वरील सर्व निकषांवर खरा उतरतो.
-डॉ. बी. आर. आंबेडकर
| Author | Dr. Babasaheb Ambedkar |
|---|---|
| Binding | Hard bound |
| ISBN | 9788191097962 |
| Language | Marathi |
| Publication | Vinimay publications |
Reviews
There are no reviews yet.