Additional information
| Author | Bhalchandra Nemade |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171853748 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹400.00
हूल’मध्ये भालचंद्र नेमाडे यांनी चांगदेवचा एक वर्षाचा नोकरीचा कालावधी चलत्चित्रासारखा दर्शवला. सहजसुंदर गतिमान शैलीत चांगदेवचे एक वर्ष शब्दवद्ध झाले. या कालावधीत चांगदेव जे नवीन जीवन अनुभवतो, माणसे पाहतो व त्यांसंदर्भात चिंतन करतो त्यातून लेखक फार महत्त्वाचे भाष्य करतात. स्त्रीवादाला पूरक असेच ते असल्याचे नमूद करावे लागेल.
‘हूल’मधील चांगदेव संकल्पित चतुष्टयातील असल्यामुळे त्याच्या प्रेरणांचा प्रवास ‘बिढार’पासूनच लक्षात घ्यावा लागतो. प्रस्थापित व्यवस्थेला समाजमान्य पुरुष प्रतिमेला तो निमूटपणे स्वीकारत नाही हे त्याचे सर्वाधिक महत्त्वाचे वैशिष्ट्य. कुलदीपक म्हणून असणारी नेमस्त कर्तव्ये व्यवहारी स्वार्थीपणातून निर्माण झाल्याचे त्याला जाणवते व ते जगणे वीट आणत जाते. महानगरीत जीवनसंस्कृती काही बाबत त्याला महत्त्वाची वाटते, पण प्रत्येकाचा स्व-केंद्रीपणा रुचत नाही. कॉलेजच्या गावातील मुसलमानांची सामाजिकता मात्र त्याला भावते. प्राध्यापक म्हणून रूजू झाल्यावर विद्यार्थ्यांचे वर्गातले, रस्त्यावरचे विचित्र वात्रट-निर्लज्जपणाचे अनुभव त्याला अस्वस्थ करतात. प्राध्यापकी म्हणजे फक्त ठरावीक पाट्या टाकणे, वेळ निभावून नेणे, हे त्याला पटत नाही. यातून एक विचित्र निर्लज्जपणाची भावना त्याच्यात निर्माण होते. विद्यार्थ्याशी त्याचे संबंध जरी निर्माण झाले तरी समस्त विद्यार्थी वर्गावर प्रभाव पडून ते विद्यार्थी आमूलाग्र बदलले असे चित्र साकारत नाही. त्याच्या कॉलेजवरचे विद्यार्थी हे गावातील सामाजिक व्यवस्थेतून आलेले वास्तव आहे. गाव सूक्ष्मतेने पाहून घेतल्यावर त्यातील गलिच्छपणा व त्यांच्या अभिरूची त्याच्या नजरेस येतात, सर्वात गलिच्छ म्हणजे गल्ल्यांची नावे. जातीगणिक वस्ती करून लोक राहाताहेत हे चांगदेवला बरे वाटत नाही. भारतीय सामाजिकतेचे हे वास्तव अगदी तपशीलपूर्वक येथे नेमाडे यांनी चित्रित केले.
शोभा नाईक
| Author | Bhalchandra Nemade |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171853748 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.