Additional information
| Author | Indira Sant |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171855018 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹1,350.00
इंदिराबाईंच्या व्यक्तिमत्त्वानं तोललेली त्यांच्या काव्याची कमान ही स्मृतीतील भूतकाल आणि भविष्यातील जीवनाचा अंत यांना जोडीत असताना या विस्तृत कालभागाबरोबर तितकाच विस्तृत स्थलभाग व्यापून जाते. त्या एकीकडे लहानश्या अगदी लहानश्या घटनेतील अनुभवाचं स्पंदन पकडतातः पण ते सापडल्यानंतर मात्र पसरून देतात क्षितिजापासून क्षितिजापर्यंत. भावनाशयाच्या सूक्ष्म सूक्ष्मतर होत जाणाऱ्या जाणिवेच्या अभिव्यक्तीला ‘रंगमंच’ मिळतो; तो मात्र सारं विश्वच सामावून घेणाऱ्या अवकाशाचा. आपल्या लहानश्या वास्तूविश्वात वर्तमानाच्या पिंजऱ्यात अडकलेल्या या व्यक्तिमत्त्वाला मग कधी न सापडणाऱ्या अथांग अवकाशाची आस लागते. त्या अथांगपणात स्वतःला विलीन करण्याचा ध्यास लागतो. स्थलकालाच्या अखंडपणाची व अथांगपणाची जाणीव आणि व्यक्तिमत्त्वाच्या मर्यादा यांत मग संघर्ष सुरू होतो. हे व्यक्तिमत्त्व मग बंधनाची, एकलेपणाची जाणीव सोशीत राहते. आणि या जाणिवेची व्यथा मग शब्दांत उतरते……
इंदिराबाईंच्या कविता वाचताना वाटत राहतं. कालाची अशी जाणीव पूर्वी कधी झाली नव्हती. अवकाश इतक्या निकटतेने कधी जवळ आलं नव्हतं. आणि दोन अनादी अनंत परिमाणांच्या कैचीत सापडलेल्या जिवाचं असं एकाकीपण पूर्वी कुठं बघितलं नव्हतं. वेदनेला अशी वाचा कधी मिळाली नव्हती. केवळ अस्तित्वाचाच असा भयंकर थकवा कधी आढळला नव्हता. आणि या सान्यांनाच पोटात घेऊन पसरलेला असा भयाण काळोख पूर्वी कधी पाहिला नव्हता.
इंदिराबाईंच्या कवितेनं हे सारं दिलं.
माधव आचवल
Out of stock
| Author | Indira Sant |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171855018 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.