Additional information
| Author | Dr. Suvarna Naik Nimbalkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9789384497040 |
| Language | Marathi |
| Publication | Sanskruti Prakashan |
₹180.00
‘समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज’ हा डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांचा ग्रंथ एकूण सत्तावीस प्रकरणात विभागलेला आहे. ५० वर्षांच्या कालखंडात या संस्थांनाला अल्पायुषी राजे मिळाल्याने ब्रिटिश प्रतिनिधींची वाढीस लागलेली हुकूमशाही वृत्ती, ग्रामाधिकारी, भट, सावकार, वकील, कारकून यांच्या अन्यायकारक कारभाराने रयतेचे होणारे शोषण, या पार्श्वभूमीवर १८७४ ला राजर्षी शाहू महाराज करवीर संस्थानच्या गादीवर विराजमान झाले. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीने भारावलेल्या या कालखंडात आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक स्वातंत्र्य या विवादात न पडता सामाजिक लोकशाहीचा पाया घालण्यात शाहूराजे यांचा सिंहाचा वाटा कसा होता, याची केलेली सैधांतिक चर्चा यामुळे डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांचा हा ग्रंथ लक्षणीय ठरणारा आहे.
शाहू महाराजांच्या चरित्रात्मक ग्रंथापेक्षा निव्वळ समाज क्रांतिकारक म्हणून केलेल्या कार्याची स्वतंत्रपणे ओळख व्हावी व समाजापर्यंत पोहचावी हाच या ग्रंथाचा मुलभूत हेतू आहे.
‘समाज क्रांतिकारक शाहू महाराज’ या ग्रंथातून शाहू महाराजांच्या समाजकार्यांशी सखोल परंतु आटोपशीर ओळख वाचकांना निश्चितच आनंद देईल.
– • डॉ. कृष्णा किरवले
Out of stock
| Author | Dr. Suvarna Naik Nimbalkar |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9789384497040 |
| Language | Marathi |
| Publication | Sanskruti Prakashan |
Reviews
There are no reviews yet.