Sale!

Badal Sircar : Ek Janvadi Natyakarmi ( बादल सरकार : एक जनवादी नाट्यकर्मी )

225.00

कमानी रंगमंच नाकारणारे बादलबाबू आणि त्यांच्या तिसऱ्या रंगभूमीची संकल्पना समजून घ्यायची असेल तर अगोदर कमानी रंगमंचावर होणारी नाटकं, शहरी आणि ग्रामीण नाटकांचा स्वभावधर्म परिचित व्हायला हवा. त्याचबरोबर बादलबाबूंच्या जीवनदृष्टीचीही ओळख करून घ्यायला हवी. बादलदांची जडणघडण कशी झाली, हे त्यांच्या या चरित्रावरून समजते आणि नाटक या संस्थेकडे ते कोणत्या हेतूने पाहतात हे लक्षात येते.
बादलदा परदेश फिरून आले आणि तिकडे पाहिलेल्या रंगभूमीचा त्यांच्यावर विलक्षण परिणाम झाला. नेपथ्य, प्रकाश योजना, वेशभूषेचा झगमगाट, तांत्रिकतेचा वापर यांच्याशिवाय नाटक किती परिणामकारक होऊ शकतं याचा त्यांनी स्वतः अनुभव घेतला तो या सर्व प्रकारच्या अवलोकनातून प्रेरणा घेऊन. भारतीय संस्कृतीच्या मुशीतून त्यांनी एक वेगळेच नाट्यविधान सिद्ध केले. जे नाटक हाडामासाच्या माणसांचे होते, माणसातले होते. न भूतो न भविष्यती होते. तिसऱ्या रंगभूमीचा हा जन्म होता. कुठलाही आणि कसलाही जामानिमा न करता एका ग्रीक राजाराणीची शोकांतिका प्रेक्षकातच उभी राहते आणि प्रेक्षकांना हादरवून टाकते, हे आपल्याकडेही शक्य का होणार नाही? कितीतरी ज्वलंत प्रश्न आपल्याकडे आहेत ते याच पद्धतीने लोकांना भिडवता येतील. नाटक आणि समाजकारण यांच्या कळा असह्य झाल्या आणि तिसऱ्या रंगभूमीचा जन्म झाला. ‘तिसरी रंगभूमी’ हे माझं कार्य नसून ते माझं तत्त्वज्ञान आहे, असं ते नेहमी म्हणायचे.
चळवळ म्हणजे काय आणि नाट्य चळवळ कशी उभी राहते हे ज्यांना मनापासून जाणून घ्यायचे असेल त्यांनी बादलबाबूंची ही कहाणी वाचायलाच हवी.
– कमलाकर नाडकर्णी

Additional information

Author

Avinash Kadam

Binding

Paperback

ISBN

9789393134530

Language

Marathi

Publication

Lokvangmaya Griha

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Badal Sircar : Ek Janvadi Natyakarmi ( बादल सरकार : एक जनवादी नाट्यकर्मी )”

Your email address will not be published. Required fields are marked *