Sale!

जगावेगळे बना श्रीमंत व्हा ! । Jagavegale Bana, Shrimant Vha !

₹350.00

झटपट श्रीमंत व्हा,’ अशा मार्गदर्शक मालिकेतील हे पुस्तक नाही. ‘जगावेगळे बना आणि श्रीमंत व्हा !’ हे पुस्तक म्हणजे १५० वर्षांच्या सांस्कृतिक आणि व्यावसायिक इतिहासाची अंतर्दृष्टी विकसित करणारा, ज्ञानवर्धक विचारप्रवर्तक प्रवास आहे. अनेक उपयुक्त सल्ले, वस्तुस्थितीची रोचक मांडणी आणि बऱ्याच छोट्या-मोठ्या मनोरंजक कहाण्यांनी या पुस्तकाची गुणवत्ता वाढवली आहे. हे पुस्तक तुम्हाला कॅलिफोर्नियातील ‘गोल्डरश पासून युद्धजन्य बर्लिनपर्यंतचे नेते आणि तिथून अत्याधुनिक काळातील सिलिकॉन व्हॅलीत आणून सोडते. तसेच डिस्नेलँडपासून सौदी अरेबियापर्यंत आणि लेव्ही स्ट्रॉसपासून स्टारबक्सपर्यंत, जॉन डी. रॉकफेलरच्या तेलविहिरीपासून वॉरन बफेंच्या ओम्हापर्यंत फिरवून आणते. शिवाय अनंत अडथळ्यांवर मात करून, अत्युच्च ध्येय गाठण्यात यशस्वी झालेल्या महत्त्वाकांक्षी स्त्री-पुरुषांच्या यशकथांमधून वाचकालाही त्याचं लक्ष्य साकारण्यासाठी प्रोत्साहित करते.

या पुस्तकात, यशस्वी स्त्री-पुरुष उद्योजकांव्यतिरिक्त जागतिक पातळीवरील खेळाडू, संगीतकार आणि अन्य मान्यवरांबरोबरच स्टीव्ह जॉब्स, कोको, शेनल आणि अर्नोल्ड वाइज्नेगर यांच्यासारख्या अनेक दिग्गजांच्या देदीप्यमान कहाण्या आहेत. हया महनीय व्यक्ती आणि जीवनात ज्यांना खूप कमी किंवा अजिबात यश मिळालेले नाही अशा बहुसंख्य लोकांमध्ये; फक्त प्रचंड संपत्ती एवढा एकच फरक नाही, तर आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. ‘जगावेगळे बना आणि श्रीमंत व्हा’ हे पुस्तक तुम्हाला यशस्वी होण्याचे तत्त्वज्ञान प्रदान करतं. म्हणून भव्य स्वप्न पाहण्याचे साहस असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक आहे.

यशाचं नेमकं रहस्य जाणून, ते सर्वांसाठी उघड करण्याची अनोखी कला असलेले डॉ. राइनर झिटलमन हे एक यशस्वी उद्योजक, नेटवर्किगचे सल्लागार आणि प्रकाशक आहेत : कोणत्याही एकाच ध्येयावर शंभर टक्के लक्ष केंद्रित करणं, अडचणींमध्ये संधी शोधण्याची मानसिक शक्ती असणं, ‘नाही’, हे उत्तरादाखल कधीच न स्वीकारणं, प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा आत्मविश्वास असणं आणि प्रामाणिकपणाने सर्वांचा विश्वास जिंकून आदरास पात्र होणं, या काही अनोख्या
कला आहेत, त्यांचा विचार होणंसुद्धा गरजेचं आहे. सदर पुस्तकातून जागतिक उद्योगविश्वातील प्रतिष्ठित स्त्री-पुरुषांच्या चरित्रांचा परिचय वाचकांना होतोच, शिवाय लेखकाची मातृभूमी असलेल्या जर्मनीमध्ये युद्धानंतर झालेल्या ‘आर्थिक चमत्कारां मागे असलेल्या लोकांविषयीच्या अज्ञात माहितीवरही सदर पुस्तक प्रकाश टाकतं.

Only 2 left in stock

Additional information

Author

Dr. Rainer Zitelmann (Tr. Rajanish Joshi)

Binding

Paperback

ISBN

9789385509094

Language

Marathi

Publication

Indus Source Books

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जगावेगळे बना श्रीमंत व्हा ! । Jagavegale Bana, Shrimant Vha !”

Your email address will not be published. Required fields are marked *