Additional information
| Author | Dhananjay Keer |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171858095 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
₹720.00
श्री. धनंजय कीर ह्यांनी लिहिलेले शाहू छत्रपतींचे चरित्र हे असे आहे. व्यक्ती वादग्रस्त आणि ज्या समाजात ती वावरली तो समाजही वादळी. या दोघांचे वस्तुनिष्ठ आणि अभिनिवेशरहित चित्रण करणे अवघड. पण कीरांकडे चरित्र लेखनाची किमया आहे. ‘नामूलं लिख्यते’ ही धारणा आहे आणि चरित्रविषयांप्रमाणे रूप घेणारी लेखनकला आहे. त्यामुळे हे चरित्र वाचनीय झाले आहे. समाजक्रांतीचा प्रेषित असणारा मनुष्यच महान ठरतो, हे कीरांच्या चरित्रलेखनाचे सूत्र आहे. सावरकर, आंबेडकर, फुले यांच्या चरित्र-परंपरेतील, शाहू छत्रपती हे एक पुढचे पाऊल आहे.
महाराष्ट्र टाइम्स, मुंबई
अशा या मानवतेच्या प्रेषिताची, कर्माने राजपद भोगणाऱ्या पण सेवेने मन, बुद्धी, अंतःकरणाने क्रांतदर्शी असणाऱ्या राजसिंहाची, लोकशाहीच्या पुरस्कर्त्या, कर्त्या लोकसेवकाची, पण व्यक्तिस्वातंत्र्याचे आचरण करणाऱ्या अद्वितीय मानवाची साक्षेपी कथा मा. धनंजय कीर यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने, व्यासंगी चिकित्सक व संशोधनपर अभ्यासाने, समतोल दृष्टीने लिहिली आहे. म. फुले, डॉ. आंबेडकर व राजर्षी शाहू चरित्र लिखाणातून कीर यांनी बहुजन समाजावर फार मोठे ऋण केले आहे हे मान्यच करावे लागेल.
दै. पुढारी, कोल्हापूर
आधी ते छत्रपती शाहूमहाराजांचे लोकोत्तर चरित्र आणि त्यात श्री. कीरांची लोकविलक्षण प्रतिभा. इतिहासकाराइतकीच चरित्रलेखकावरची जबाबदारी अवघड. सत्य, सत्य आणि केवळ सत्यच निर्भयपणे प्रकाशात आणावयाचे. सत्य प्रकट करताना कुणाच्याही दबावाखाली वा दडपणाखाली न राहता, चरित्र नायकाला संपूर्ण न्याय द्यायचा ही बिकट न कामगिरी श्री. कीरांनी मोठ्या कसोशीने पार पाडली आहे.
मराठा, मुंबई
| Author | Dhananjay Keer |
|---|---|
| Binding | Paperback |
| ISBN | 9788171858095 |
| Language | Marathi |
| Publication | Popular Prakashan Pvt. Ltd. |
Reviews
There are no reviews yet.