Additional information
| Author | Ram Puniyani |
|---|---|
| Binding | Paperback |
| Language | Marathi |
| Publication | Lokvangmaya Griha |
₹325.00
Jamavtvadache Rajkaran Aani Bhartiy Loktantra Part 1 (जमातवादाचे राजकारण आणि भारतीय लोकतंत्र भाग १
हे पुस्तक मी गेल्या काही वर्षांत लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. हे लेख त्या त्या काळी उद्भवलेल्या व सांप्रदायिक राजकारणाशी निगडित प्रश्नांबाबत आहेत. ते जरी विशिष्ट काळाशी संबंधित असले तरी सांप्रदायिक राजकारणामागील वैचारिक मांडणी उघडी करण्याचा प्रयत्न करतात. संप्रदायिकता वरवर जरी हिंदू-मुस्लिम, हिंदू-ख्रिश्चन प्रश्नाभोवती घोटाळत दिसली तरी तिचा गाभा धर्माच्या अशा मांडणीत आहे ज्यात असमानतेला मान्यता दिली गेली आहे. पुस्तकाचा पहिला भाग संप्रदायिकतेची ती अंगे उलगडतो ज्यात धर्मावर आधारित ओळख राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वापरली जाते. याच भागात धर्माची वेगवेगळी रूपे आहेत यावरही प्रकाश टाकला आहे. धर्माची ती रूपे,जी जनतेच्या हिताशी जवळीक साधतात, ज्यांत नीतिमत्तेला महत्त्व आहे, ती भारतीय संदर्भात भक्ती व सुफी परंपरांची आहेत. सध्याच्या बऱ्याच प्रचलित श्रद्धाही धार्मिक भाषेत मांडल्या जातात. त्यातून असा समज पक्का होऊ लागतो की सर्व पौराणिक कथा खऱ्याच होत्या. या पुराणकथांच्या एका बाजूला धर्माचा आधार व दुसऱ्या बाजूला ज्ञानाचा आधार करण्यात येत आहे. – राम पुनियानी
Jamatvadi Hinsa Aani Dharmik Rashtravad Part 2 (जमातवादी हिंसा आणि धार्मिक राष्ट्रवाद)
जातीयवाद आणि जातीयवादी हिंसा या आपल्या देशासाठी शाप सल्याने, अशा जातीयवादी मुद्द्यांवर राजकीय पक्षांनी आपल्या पोळ्या भजने आपल्या देशाला परवडणारे नाही. आपल्या सामाजिक जीवनातून असे मुद्दे त्वरित हद्दपार करून टाकणे गरजेचे आहे. राजकारण लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांवर व सर्वांच्या प्रतिष्ठेशी संबंधित मुद्द्यांवर उभारलेले असले पाहिजे. ‘शाश्वत जागरूकता ही स्वातंत्र्याची किंमत आहे.’ अशी एक प्रसिद्ध महान आहे. भारतात आपल्याला जातीयवादी मुद्द्यांना सातत्यपूर्णतेत विरोध करायला संकल्प करायला हवा, आपल्या समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विवाद निर्माण करणाऱ्या मुद्द्यांना सातत्याने काढून टाकण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण हे अनुभवले आहे की, सांप्रदायिक संघटनांना धार्मिक अल्पसंख्याकांबद्दल तिरस्कार जागविण्यात यश आले आहे व त्यामुळे सांप्रदायिक हिंसाचार होतो,समाजात दुफळी माजते व सांप्रदायिक पक्ष अधिकाधिक ताकदवान होत जातो. हे लेख वेगवेगळ्या वेळी घडलेल्या वाढत्या सांप्रदायिक घटनांवर प्रतिक्रिया म्हणून लिहिले गेले. ते समाजातील सांप्रदायिक संकटावर प्रकाश टाकतात.
– राम पुनियानीआपल्या सामाजिक चळवळींनी सर्वसामान्य जनतेला जी विविधतेने नटलेल्या लोकशाही समाजाची ओढ आहे,तिला प्राधान्य देणे आज गरजेचे आहे. यासाठी सांप्रदायिक शक्तींनी व प्रसार माध्यमांनी ज्या सामाजिक मानसिकतेला जनतेत पसरवण्याचा प्रयत्न चालवला आहे त्याचा आपण प्रतिवाद केला पाहिजे. आपल्याला भगतसिंग,आंबेडकर, गांधी यांची नीतिमूल्ये पुनर्प्रस्थापित करावी लागतील. पंडित जवाहरलाल नेहरूंनी घालून दिलेल्या प्रगतीचा मार्ग स्वीकारावा लागेल,औद्योगिक व शैक्षणिक विकास करावा लागेल व सर्वसमावेशक राजकारण, जे सामाजिक मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत त्याचा अंगीकार करावा लागेल. यासाठी फुटपाड्या सांप्रदायिक राजकारणाचा सर्व ताकदीनिशी प्रतिकार करावा लागेल. आशा आहे की हे पुस्तक फुटपाड्या राजकारणाचा छुपा अजेंडा उघडा करून,गेली काही दशके ताकदवर होत चाललेल्या फुटपाड्या राजकारणाचा प्रतिवाद करण्यास मदत करेल.
– राम पुनियानी
Out of stock
| Author | Ram Puniyani |
|---|---|
| Binding | Paperback |
| Language | Marathi |
| Publication | Lokvangmaya Griha |
Reviews
There are no reviews yet.