Sale!

सिंधुतील साम्राज्ये : एका नदीची कहानी | Sindhutil Samrajye : eka Nadichi kahani

495.00

सिंधू नदी ! जगातल्या सर्वात मोठ्या नद्यांमधली एक अशी आहे, जी तिबेटमधील पहाडात उगम पावून पश्चिमेकडे वाहत जाताना, उत्तर हिंदुस्थानातुन पाकिस्तानात शिरते आणि आणि कराची जवळ समुद्राला मिळते. हजारो वर्षांपासून तिची पूजा केली जात आहे. वसाहतवाद्यांनी यांनी शेकडो वर्षांपासून साम्राज्ये वाढवणे आणि टिकवण्यासाठी ह्याच सिंधूचा उपयोग केला आहे. आणि आज सिंधूच्याच आधाराने पाकिस्तान देश कसाबसा टिकून आहे. पाच हजार वर्षांपूर्वी सिंधूच्या काठावर पाच समृद्ध शहरं नांदत होती याच नदीतून त्या शहरांतील व्यापारी जगभर जात येत होते. याच नदीच्या काठावर आणि त्यां नष्ट झालेल्या शहरांच्या उध्वस्त अवशेषांमार्फत संस्कृत बोलणारे, संस्कृतात ऋग्वेदा सारखे ग्रंथ रचणारे भटके पंडित हिंडत होते. गेल्या दोन हजार वर्षात अलेक्झांडर पासून अनेक आक्रमक अफगाणी सुलतान आणि ब्रिटिश वसाहतवाद्यांना सिंधू काबीज करण्याच्या इच्छेने वेडेपिसे करून सोडले होते.
या सगळ्या धुमश्चक्रीत सिंधूच्या खोऱ्यातून शेकडो वर्षे रेशमाचे व्यापारी, चीनपासून दक्षिण-मध्य आशियापर्यंत फिरत होते. सुफी संतांचे आश्रयस्थान असलेल्या सिंधूच्या खोर्‍यातच शीख धर्माचा उदय झाला.
सदर पुस्तकाचे बोट धरून वाचक, सिंधूच्या पात्रातून, कराची पासून ते तिबेट पर्यंत दोन हजार मैल प्रवास करतीलच. त्याचबरोबर त्यांना सिंधूच्या खोऱ्यात घडलेल्या पाच हजार वर्षांच्या इतिहासाचाही मागोवा घेता येईल.
तसेच इतिहासात घडलेल्या घटनांचे धागेदोरे, सिंधूच्या काठावरील वर्तमानातल्या परिस्थितीत कसे पोहोचले; आहे हे ही पाहता येईल.

Additional information

Author

एलिस अल्बिनिया (अनु. श्याम नारायण पाठक / Alice Albnia (Tr. Shyam Narayan Pathak)

Binding

Paperback

ISBN

9789388509421

Language

Marathi

Publication

Indus Source Books

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सिंधुतील साम्राज्ये : एका नदीची कहानी | Sindhutil Samrajye : eka Nadichi kahani”

Your email address will not be published. Required fields are marked *